दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
हिरापुर दिनांक 31 /10/2022
तुकडोजी महाराज पुतळा सेवा स्मारक समिति व गुरुदेव सेवा मंडल हिरापुर यांच्या सयुक्त विद्यमाने ,संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव हिरापुर येथे मोठ्या उत्साह वर्धक वातावरणात सम्पन्न झाला .या महोत्सवाची सांगता आज दी 31 ऑक्टोम्बर 2022 ला करण्यात आली आहे.
पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृति पुतल्यासआकर्षक अशा रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आले. गावचे प्रवेशद्वार आणि पुतळा परिसर हे आकर्षक अशा रोषणाईने झगमगवून गेले.सोमवार ला पहाटे साडेचार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतल्या जवळ तीर्थस्थापना आणि ग्रामगिता पूजन करण्यात आले. यावेळी अखंड भजन वादनासह महोत्सवाला प्रारंभ झाला. हिरापुर येथे सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभा यात्रेत बाहेर गावचे भजन मंडली सहभागी झाली होती, व दुपारी गुरदेव विचार प्रचारक मा.श्री-सुलपान महाराज,वरोरा यांचे जाहिर सामाजिक जनजागृति किर्तन सादर करण्यात आले. त्या नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले.
सायंकाळी सामुदायिक प्रार्थना करून कायकर्माची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वश्री- बंडु अवगान(अध्यक्ष),अनिल लोडे (सचिव),संतोष पाचभाई(कोषध्यक्ष),प्रवीन पावड़े,संदीप पाचभाई,अमोल पावड़े,मारोती धार्मिक,नितेश लोडे, दीपक बल्कि,संजय पावड़े,कार्तिक पाचभाई, किशन शेडामे व समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले.