दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
आज दिनांक 31/10/2022 रोजी शराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव ज्योतिताई बाबरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मॅडम यांना राशन कार्ड बद्दल खालील प्रकारची लिखित माहिती देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले
1.बल्लारपूर शहरामध्ये राशन चे एकूण कंट्रोल किती, त्याचा उघडण्याचा व बंद करण्याचा वेळ कोणता,
2.कोण कोणत्या कंट्रोल मध्ये किती राशन कार्ड धारक आहेत,
3.अंतोदय, BPL व APL धारक कीती,
4.मोफत राशन केव्हापासून आणि कधीपर्यंत येणार आहे, ते कोणाला मिळतात आणि त्यामध्ये कोणते अनाज येतात, त्याचे कशाप्रकारे वाटप केले जातात,
5.BPL कार्ड धारक ला प्रति व्यक्ती किती अनाज मिळते, तसेच APL व अंतोदय व्यक्तीला किती अनाज मिळते,
6.कंट्रोल चे अनाज दिल्यानंतर धारकांना पावती कश्याप्रकारे दिली जाते,
7.राशन धारकांच्या घरातील सर्वांचे अंगठा स्कॅन स्वीकार होतात काय,
8.सर्वांना प्रत्येक महिन्यातील अनाज त्याच माहीन्यात मिळते काय, जर एखाद्या धारकाने माहिन्यात अनाज घेतले नाही तर त्या महिन्यातील अनाज त्याला दुसऱ्या महिन्यात मिळते काय
अशाप्रकारची सर्व माहिती लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व लवकरच याबद्दल प्रत्येक कंट्रोल मध्ये सर्वे होणार व काय घोळ व किती भ्रष्टाचार चालला आहे हे जनतेच्या समोर आम आदमी पार्टी आणणार असे आव्हान करण्यात आले.
या वेळी शहर उपाध्यक्ष अफझल अली जी आणि गणेश सिलगमवार जी, सचिव ज्योतिताई बाबरे, युथ अध्यक्ष सागर कांबळे,उपाध्यक्ष गगन सकिनाला, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्धीकी, वस्ती विभाग चुनाव प्रभारी प्रा. वाळके सर, स्मिताताई लोहकरे इत्यादी उपस्थित होते