
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल या इमारतीला रविवारी दुपारच्या वेळेस आग भिषण आग लागली असून आगीने रुद्र रूप धारण केलं आहे. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हे आग लागलेली असून गावातील आजूबाजू जवळील लोकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आग इतकी भयंकर होती की इमारतीतील दोन वर्गांचा खूप नुकसान झालेलं आहे वर्गामधील काही खुर्च्या टेबले फर्निचर सामान जळून खाक झालेले गावातील सामाजिक कार्यकर्ते लगेच अग्निशामक कार्यालयात फोन करून तात्काळ दोन गाड्या बोलावून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे दोन गाड्या आले होते तरीपण गावातील काही व्यक्तींनी बकिटांनी भांड्यांनी सहाय्याने त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळे तेथील शिक्षकांना काही नुकसान झालेल्या नाही खरंतर शिक्षक लोकांनी त्याची काळजी घ्यायला हवी होती . तसेच बिलोली मधील माजी नगराध्यक्ष संतोष दादा कुलकर्णी .तसेच पांडे तलाठी. माजी नगरसेवक यशवंत गादगे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून देवांना तोंड रोड छत्राजी गुडमलवार गफार शेख येसूबाई कलीम भाई गोपाल हरणे बंटी इ. भरपूर काही व्यक्तींनी आग विझवण्याचा प्रयत्न केलेला होता. लगेच पोलीस प्रशासन पण उपस्थित होते आग कशी लागली हे अजून अद्याप स्पष्ट झालेले नसून याचा तपास सुरू आहे. काही जीवित हानी झालेली नसून शाळेतील दस्तावेज सांभाळ करून बाजूच्या रूम मध्ये ठेवले आहे. मुख्य इमारतीतील दोन वर्ग फर्निचर भरून असल्यामुळे लाकडी टेबल लाकडी खुर्च्या बोर्ड स्कूल हे जळून खाक झाले आहे.