दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील जयपूर काकडे येथील संत रंगनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था (सचिव)व संत बाबामहाराज किर्लेकर मंदिर संस्थान (उपाध्यक्ष)या दोन्ही संस्थांनाच्या माध्यमातून ह. भ. प. चेतन महाराज काकडे जयपूकर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत भजन,कीर्तन प्रवचन आणि मार्गदर्शनातून वारकरी संप्रदायाची नितांत सेवा करीत विज्ञानाच्या युगात सध्याच्या परिस्थितीत समाजाला योग्य मार्गदर्शन योग्य दिशा व्यसनमुक्ती करण्याचे कार्य चालू असतें. त्या कार्याची कदर करून विश्व् वारकरी संघाने महाराजांची निवड केली.