दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : दि.०३:- देगलूर येथे पुरवठा विभागातील महिला अव्वल कारकून जे. एच. गंगासागरे यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याबाबत अर्जदार गजानन गंगाधर बिडकर संपादक साप्ताहिक महिमा खादीचा, व सतीश मारोती कयादारे प्रतिनिधी दैनिक महासागर समाचार यांच्या कडून मा.श्नी.उपजिल्हा दंडाधिकारी तथा/ उपजिल्हाधिकारी/सहाय्यक जिल्हाधिकारी, कार्यालय देगलूर यांना काही पत्रकारांना सोबत घेऊन निवेदन देण्यात आले.दिनांक 28 -9- 2022 रोजी जन माहिती अधिकारी /शिधानियंत्रण अधिकारी पुरवठा अधिकारी /तहसील कार्यालय देगलूर. येथे माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याला अनुसरून पुरवठा विभागात माहिती चा अर्ज केला असता दिनांक 3- 11- 2022 रोजपर्यंत कसल्याही प्रकारची माहिती या कार्यालयातून प्राप्त झाली नाही त्यामुळे मी मा. तहसीलदार साहेबांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित अव्वल कारकून यांना बोलावून त्यांना माहिती देण्याचे सांगितले त्यानुसार महिला अव्वल कारकून यांनी अर्जदारांना दोन दिवसांनी येण्याचे सांगितले ते दोन दिवसानंतर संबंधित अव्वल कारकून जे. एच. गंगासागरे यांना याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता तुम्ही काय म्हणून आम्हाला माहिती विचारतात तुम्ही कोण, तुमचा काय संबंध, तुम्हाला काय काही तक्रार करायची असल्यास तुम्ही सरळ कोर्टामध्ये जा. असे सांगत तुम्ही माझ्या टेबल जवळ थांबू नका तहसीलदार यांना भेटा मी माहिती देणार नाही असे आवार्च भाषेत बोलू लागल्या. संबंधित महिला कारकून काही दात देत नसल्यामुळे काही स्थानिक पत्रकारांना याबाबतीत सांगितले असता संबंधित पत्रकार समीभाई (मेरी आवाज,न्यूजलाईव्ह), नाजीमभाई (पत्रकार )सतीश कयादारे (दैनिक महासागर) शशिकांत पटणे (पब्लिक न्यूज) व अन्य पत्रकार यांनी अर्जदारासोबत संबंधित महिला कर्मचारी गंगासागरे यांना विचारणा करीत असता तुम्ही कोण असे बोलून सदरील काम माझे नसून डीएसओ चे आहे असे सांगत स्थानिक च्या पत्रकारांना देखील उद्धटपणे बोलू लागल्या, माझे कोणी काही करू शकत नाही, असे बोलू लागल्या या महिला कर्मचारी कधीच वेळेवर ऑफिसमध्ये उपस्थित राहत नाहीत असे यावेळी अनेकदा तक्रार देखील झाली असताना केवळ महिला आहेत यामुळे कुठलीही कारवाई न करत त्यांना वारंवार अधिकाऱ्याकडून समज देखील बजावण्यात आलेले होते.इतकेच नव्हे तर यांच्यासोबत चे कर्मचारी देखील यांना त्रासून गेलेले आहेत असे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे पूर्वी देखील अनेक लोकप्रतिनिधींना देखील त्यांनी अवार्च भाषेत बोलले आहेत सदरील विभागात काही शिधापुरवठाधारकां सोबत हात मिळवणी करून कायद्याला बगल देऊन कारभार करीत असल्याचा संशय असल्याने अर्जदाराने दिनांक ७-१०-२०२२ रोजी चौकशीच्या साठी निवेदन देखील दिलेले होते, पण आमच्या माहिती च्या अधिकारात यांनी उत्तरे दिली असता यांचे पितळ उघडे पडेल म्हणून त्यांनी आजवर आम्हाला माहिती पुरवली नाही त्यामुळे सदरील महिला अव्वल कारकून जे. एच. गंगासागरे यांच्या बाबत आपण जातीने चौकशी करून त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांना शिस्त बसेल.
सदर बाबतीत तात्काळ चौकशी न झाल्यास दि.१०/११/२०२२ पासून उपोषणास बसणार असल्याचे अर्जदाराने सांगितले आहे.