दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे:संभाजी गोसावी
सलग १२ ते १६ तास काम कधीकधी डबल म्हणजे दिवसावर रात्रपाळी ड्युटी अनेकांना ना पीएफ मिळतो, ना बोनस आरोग्यांच्या हमी तर दूरच अशी व्यथा आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षकांची शहरांतील इमारती सोसायट्या, ऑफिस शाळा कॉलेज विद्यापीठे महापालिकेसारखी सरकारी कार्यालय येथील सुरक्षारक्षक दिसायला रुबाबदार असला तरी तोही आर्थिक पिळणुकीचा शिकार ठरत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. सरकारी दरबारी मात्र याबद्दल अनास्थाच आहे. मात्र आपल्या कुटुंबाच्या निर्धारवणासाठी सुरक्षारक्षक आपली ड्युटी बजवतात. कधीकाळी काही घरगुती कारणास्तंव मधूनच त्यांनी काम सोडलं तर त्यांना काही ठेकेदारांकडूंन पगारही दिला जात नाही अशी अवस्था सध्या चांगलीच निर्माण झाली आहे. तसेच ठेकेदारी पद्धत आणि कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक भरती केले जातात. दैनिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात छापून ठेकेदार सिक्युरिटी गार्ड मिळवतात व त्यांना राहण्याची जेवणाची सोय पीएफ बोनस या सुविधा लागू असे सांगून त्यांना ड्युटी देतात मात्र मागले पाढे पंचावन्न अशी अवस्था सध्या चांगलीच निर्माण आहे. परंतु सुरक्षारक्षकांना कोणत्या सुविधा मिळत नाहीत. फक्त कुटुंबाच्या निर्धारवासाठी सुरक्षा रक्षक आपली ड्युटी करीत असतो. याचाच फायदा ठेकेदार घेत असतात. मात्र आता सुरक्षारक्षकांनाही चांगलाच दिलासा मिळणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे पुढे म्हणाले.. सध्याचे एक सदस्यीय सुरक्षारक्षक बोर्ड लवकरच बहु सदस्यीय होणार त्यांच्यावर सध्या विचार सुरू असून पुढील दोन महिन्यांत सुरक्षारक्षक बोर्डात शासनांच्या प्रतिनिधीसह इतर सदस्यही असतील जे खाजगी कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.