
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – माधव गोटमवाड
मराठी मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघात झाला असून जागीच तिचा मृत्यू झाला आहे.
ही बातमी कळताच सिनेसृष्टीत शोककळा पसरलीये. अत्यंत कमी वेळामध्ये कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्का बसलाय. सुरूवातीला अनेकांना ही फक्त अफवा असल्याचे देखील वाटले होते.
कल्याणीचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ही बातमी समोर येताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता.
काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव हिने हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने एक हाॅटेल सुरू केले होते. मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्येच आता अभिनेत्री कल्याणी हिचाही मृत्यू झाला आहे.
या बातमीमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.