दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी –
बिरसा फायटर्सची रांझणी गावात २६० शाखेचे उद्धघाटन
तळोदा(प्रतिनिधी)ग्रामीण भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी व प्रत्यक्ष विकास होण्यासाठी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे.यासाठी चांगले शिक्षण घेऊन एक चांगली कृतिशील सामाजिक पिढी निर्माण झाली पाहिजे.पालकांनीही पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे असे बिरसा फायटर्स राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी विचार मांडले.भरत पावरा जिल्हाध्यक्ष यांनी आपली अमूल्य संस्कृती जोपसली पाहिजे असे आवाहन केले.बीटीएस जिल्हाध्यक्ष देविसिंग वळवी यांनीही संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले.यावेळी रांझणी गावांची शाखा घोषित करण्यात आली.शाखाध्यक्ष सुरेश मोरे,उपाध्यक्ष नागेश पाडवी,सचिव अरुण पाडवी, सहसचिव योगेश पाडवी, कार्याध्यक्ष गोरखनाथ पाडवी,सल्लागार वासूदेव नाईक,कोषाध्यक्ष दिनकर मोरे,संघटक विलास नाईक, सहसंघटक जगदीश वळवी,निरीक्षक रविसिंग ठाकरे,प्रसिद्धीप्रमुख वसंत पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,तालुका कार्याध्यक्ष किरण पाडवी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.