दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे . .
लोहा: कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा लोहा अंतर्गत मौजे अंतेश्वर ता.लोहा. येथे पिक करडई शेतीशाळेमध्ये करडई पिक शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे .कृषि विभागाच्या धोरणानुसार सोयाबीन पिकांमध्ये शेतक-यांना प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन पिकातील विविध अवस्थेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील रब्बी हंगामात हरभरा पिकासोबत बहुतांश शेतकरी तेल वर्गिय करडई पीक लागवडीला महत्त्व देतात.यांच अनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने रविशंकर चलवदे प्रकल्प संचालक नांदेड , श्रीमती माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालक , संदानद पोटपेलवार तालुका कृषि अधिकारी लोहा, यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद यांनी मौजे अंतेश्वर येथे शेतीशाळेचे आयोजन केले आहे.
आत्मा अंतर्गत आयोजन : करडई पिकाविषयी एकूण पाच सत्र शेतीशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत यामध्ये १) पेरणीपूर्व २) पेरणी व रोपावस्था, ३) शाखीय वाढ व फुलोरावस्था,४)बोंडे लागणे व पक्वता, ५)काढणी व काढणीपश्यात तंत्रज्ञान, प्रतवारी व साठवणूक, प्रक्रिया उद्योग ( लाकडी घन्याचे करडई तेल ) विक्री व्यवस्था याबाबत माहिती दिली जाणार आहे.व पहिले सत्र आयोजित झाले या मध्ये
शेतीशाळेत निवडलेले शेतकर्यांचे सभेत शेतीशाळेचा उद्देश, करडई उत्पादनात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणी यावर शेतकर्यांची निवड,बीजप्रक्रिया,बियाणे उगवण क्षमता चाचणी,महिलांचा शेतिविषयी निर्णय़ प्रकीया व प्रत्यक्ष कामातील सहभाग व बि.बी.एफ. पद्धतीने पेरणी, ठिबक/तुषार सिचंनाचा या विषयावर शेतीशाळा प्रशिक्षक मन्मथ गवळी,बि.ए.एस.एफ कंपनीचे शंकर नव्हाते, यां सर्वानी मार्गदर्शन केले.
या वेळी येणाऱ्या पुढच्या सत्रबाबत माहिती दिली.
या शेतीशाळेस अंतेश्वर येथील गोदावरी शेतकरी गटाचे अध्यक्ष संभाजी पाटील कराळे व सदस्य रामदास सखाराम कराळे हनुमंत कराळे, गोविंद कराळे सोपान गवते बाळू गवते गणेश कराळे विलास कराळे दासराव कराळे छत्रपती कराळे दामोदर कराळे नरहरी कराळे राम कराळे हे सर्व सदस्य उपस्थित होते.