दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी -प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरातील गुणवत्तेच्या दृष्टीने अव्वल स्थानी असलेले व विद्यार्थ्यांनी गजबजलेले आणि विविध उपक्रमांनी सजलेले श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड या कॉलेजचे नाव अपसुकच सर्वांच्या ओठावर येते. कॉलेजमध्ये विद्यार्थी केंद्रित अध्यापनसह विविध उपक्रम तथा वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम सुद्धा विद्यार्थ्यांना प्रेरित व प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित केले जातात.
त्याच अनुषंगाने श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर / नवीन कौठा नांदेड येथे भारतीय आदिवासी समाजातील क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांचा जयंती सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर कुरुडे व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य मा.परशुराम येसलवाड व पर्यवेक्षक प्रा.माधव ब्याळे यांच्या शुभ हस्ते आदिवासी क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी माध्यमिक विभागाचे सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख श्री व्यंकट उपासे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला ते आपले मत व्यक्त करताना भारतीय आदिवासी जननायक बिरसा मुंडा हे केवळ भारतीयासाठी व भारतीय आदिवासी समाजाच्या भल्या साठी कार्य केलेले व्यक्तिमत्व नसून ते इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवणारी एक शक्ती होती. इंग्रजांना सोळो की पळो करून सोडणारे एकमेव आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांनी आपल्या केवळ पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात आदिवासींना संघटित करून आदिवासींच्या भल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांच्या हितासाठी इंग्रजा विरुद्ध लढा दिला असे उद्गार व्यंकट उपासे यांनी अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक शिवराज पवळे तसेच कॉलेजचे परीक्षा विभाग प्रमुख स्वाती कान्हेगावकर , परीक्षा विभाग प्रमुख सहाय्यक ज्येष्ठ प्रा.वसंत राठोड , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास पतंगे , रसायनशास्त्र विभाग प्रमुख अमर दहिवडे , शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रा.जयवंत यानभुरे , प्रा.निलेश मोरेश्वर , प्रा.कपील सोनकांबळे , प्रा.मोरे गोविंद , प्रा.देशमुख शिवशंकर , प्रा. सोनटक्के शिवानंद प्रा.संतोष गायकवाड , प्रा. योगेश दिग्रसकर, प्रा. विक्रम लुंगारे , प्रा.शेख रेश्मा , प्रा.रत्नमाला नवघरे , प्रा.वैशाली दुलेवाड , प्रा.जाधव प्रतिभा , प्रा.जामकर दिपा , प्रा पारेकर शिल्पा , प्रा.शेख उमर , श्री प्रशांत कुरुडे , श्री बालाजी निरपणे , दैनिक चालू वार्ता उत्तर नांदेडचे शहर प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे , इत्यादी कर्मचाऱ्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती प्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग सहाय्यक प्रा. रूपाली कळसकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले