दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
आदिवासी समाजाचे जननायक क्रांतीसूर्य स्वातंत्रसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने म्हसळा येथील रा. जि. प. शाळा या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हसळा गट शिक्षण अधिकारी मा. संतोष दौड साहेब यांनी असे प्रतिपादन केले कि बिरसा मुंडा हे कोणत्या एका जातीचे किंवा धर्माचे नसून ते भारत देशाचे महान सुपूत्र आणि स्वातंत्रसेनानी होते. आपल्याला आपल्या पंजोबाच्या वडिलांचे नाव आठवत नाही पण जमतेम पंचेवीस वर्ष वय लाभलेल्या बिरसा मुंडाचे नाव मात्र पटकन येते ते कश्या मुळे तर त्यांच्या कर्तुत्ववा मुळे आणि कार्यामुळे येते . पुढे बोलत असताना असे म्हणाले कि योजना मुळे माणसे आळशी होत चाललेली आहे त्या मुळे समाजाचे नुकसान होत आहे जर समाजाचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर शिक्षण महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपणाला प्रयत्न करणे गरजेचे आहे आपण शिकलो कि योजना आपोआप आपल्या पर्यंत येतात. इतिहास सांगून व भगवान म्हणून समाजाची प्रगती होत नाही. बिरसा मुंडा यांचे इतके महान होते कि ज्या व्यक्तीचा फोटो काल्पनिक काढलेला आहे त्या व्यक्तीचे कार्य किती मोठे आणि महान आहे या कार्यक्रमासाठी मा. नायाब तहसीलदार धर्मराज पाटील साहेब मा. शाह तात्या, मा. केंद्रप्रमुख किशोर मोहिते, मा.नितीन माळीपरगे केंद्रप्रमुख,चौधरी साहेब, मा सावंत गुरुजी केंद्रप्रमुख मा. मुंडे साहेब,उपस्थिती होती मा. नायब तहसीलदार धर्मराज पाटील साहेब यांनी ही समाजाची प्रगती करायची असेल तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने गरजेचे आहे असे प्रतिपादन केले मा किशोर मोहिते सर यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यबदल माहिती दिली. श्री सावंत सर यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले मा जयसिंग बेटकर सर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून वाड्या वस्त्यावरील मुले शिक्षणा पासून वंचित आहेत त्यांना मदत करण्याचे आव्हान केले या कार्यक्रमासाठी संयोजक श्री वसावे सर, श्री उद्धव खोकले सर, श्री दिनेश चौरे, श्री कांबडी सर म्हसळा, श्री कांबडी सर काळसूरी, श्री जयसिंग बेटकर, श्री सानप सर, श्री मडावी सर, श्री लाहारे सर, श्रीमती वनिता गावित, प्रा. गुलाबसिंग गावित, डॉ बुलबुले, श्री गर्जे सर, श्री मुंडे, मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव पवार यांनी केले तर आभार श्री महेंद्र गायकवाड सर यांनी व्यक्त केले