दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – माधव गोटमवाड
देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर होता . भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना बाळासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते. ते एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि वकील आहेत.
बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत तसेच कायदेतज्ञ म्हणून प्रकाश आंबेडकर यांची ओळख आहे ,त्यांची दैनिक चालु वार्ता चे मुख्य संपादक डी एस लोखंडे पाटील यांनी भेट घेतली व दैनिक चालु वार्ता चे पेपर व लाईव्ह न्यूज चॅनेल विषयी व इतर सामाजिक विषयावर सविस्तर 45 मिनिटे चर्चा केली.
डी एस लोखंडे पाटील यांनी भेटीदरम्यान बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांना दैनिक चालू वार्ता हा अंक महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधे प्रसिद्ध होतो. तसेच आमचे सर्व जिल्ह्यामधे प्रतिनिधी आहेत ते कर्तव्यदक्ष त्या त्या जिल्ह्यांतील कामकाज पाहत आहेत. दैनिक चालु वार्ता च्या सर्व प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे दैनिक चालू वार्ताने महाराष्ट्रात कमी दिवसात चांगलेच नाव कमावले आहे. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी दैनिक चालू वार्ता न्युज पेपर व न्युज लाइव्ह चे मुख्य संपादक डी एस लोखंडे पाटील व त्यांच्या सर्व प्रतिनीधी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व संपादक डी एस लोखंडे पाटील यांचा यथोचित सन्मान केला त्याबद्दल संपादक डी एस लोखंडे पाटील यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी पंडित भाऊ दाभाडे ( संस्थापक अध्यक्ष बहुजन जनता दल ) ,पुणे जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश ताटे, पुणे प्रतिनीधी विकास मोरे सर व दैनिक चालू वार्ता चे इतर प्रतिनीधी उपस्थित होते.