दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम – शहरातील अविनाश नगर भागातील रहिवाशांच्या वतीने मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व मा.नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचा या भागातील सर्व उत्कृष्ठ दर्जाचे पक्के रस्ते तयार केल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी संजय गाढवे व संयोगिता गाढवे यांच्या हस्ते अविनाश नगर भागातील सर्व आदर्श शिक्षक,पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापक व (एम बी बी एस) वैद्यकीय पदवी साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मा.नगरसेवक संदीप मोटे, मा.नगरसेविका मेहेराजबेगम सय्यद,महेश गुळमे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.