दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भू म:– MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या STI ( स्टेट टॅक्स इनेस्पेक्टर) परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यात परंडा तालुक्यातील मौजे आसू येथील भूमिपुत्र योगेश नागनाथ मारकड याचा १० वा नंबर,तर NTC प्रवर्गातून मुलामध्ये महाराष्ट्रात पहिला नंबर मिळुन घवघवीत यश संपादन केले आहे.
अतिशय बिकट परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेवून तो यशस्वी झाला.आई ,वडील आणि 3 बहिणी असा परिवार असून आई , वडील मोलमजुरी करतात. बारावी नंतर चांगली नौकरी करायची या उद्देशाने शिक्षणाचे माहेर घर पुण्यात येऊन २०१४ ते २०१८ या वर्षात झील एज्युकेशन सोसायटी मधुन मेकॅनिकल इंजिनियरचे शिक्षण पूर्ण केलं . शिक्षण घेत असताना त्याला स्पर्धा परीक्षा ची आवड निर्माण झाली नंतर बिकट परिस्थिती मुळे खाजगी जॉब केली. तो पण ८००० हजार या तुटपुंजी पगारावर. त्याने PSI, STI या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाला सुरुवात केली नंतर lockdown मध्ये नौकरी गेली.नंतर घरी जाऊन अभ्यास चालू ठेवला.एक वर्षांनी पुन्हा सदाशिव पेठ पुणे इथे येवून पुढील तयारी चालू केली आणि स्टेट टॅक्स इन्सपेक्टर या पदाची परिक्षा देवून त्या मध्ये यशस्वी झाला. प्रतिकुल परिस्थिती, कुठलाही क्लास नसताना ध्येय समोर ठेवून जिद्दीने MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षा मध्ये STI या पदासाठी त्याचा १० वा नंबर आला तर NTC या प्रवर्गातून मुलांमध्ये महाराष्ट्रात १ नंबर आला असून त्यामुळे महाराष्ट्र सह जिल्ह्यातून,तालुक्यात तसेच गावातील नागरिक, मिञ परिवार, नातेवाईक यांनी कौतुकाची थाप दिलीच तर सर्वत्र कौतुक होत आहे.