दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर :
कार्यदर्पण या संस्थेच्या वतीने कौतुकीच्या क्षितीजावर या विशेष उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय कौतुक संमेलन २०२२ चा जनगौरव कार्यदर्पण आॅयकाॅन पुरस्कार विजयालक्ष्मी काळे यांना मिळाला आहे.दरम्यान हे पुरस्कार मुंबई मराठी पञकार संघ,पञकार भवन येथील आझाद मैदान जवळ महापालिका मार्ग सि,एस,टी येथे सदरील पुरस्काराचे बहुमान विजयालक्ष्मी काळे यांनी स्विकारले.
विजयालक्ष्मी काळे यांनी गेल्या सहा ते सात वर्षापासून सामाजिक क्षेञात केलेल्या अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्याची दखल घेवून उपरोक्त संस्थेने हा पुरस्कार दिला आहे
यावेळी या कार्यक्रमास सेवानिवृत्त विंग कमांडर राजेंद्र महानुभव,वास्तुतज्ञ डाॅ,रविराज अहिरराव,मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डाॅ,स्नेहलता देशमुख,कॅप्टन क्षितिज माटे,सिनेअमिनेता प्रा.भास्कर मयेकर,सेवानिवृत्त पोलिस आयुक्त मोहम्मद पठान यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिति होती.
दरम्यान हा मानाचा पुरस्कार सौ.काळे यांना मिळाल्याबद्दल सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रिडा,साहित्य,आरोग्य,पर्यावरन या क्षेञात काम करणार्या मान्यवरासह अनेकजणांनी काळे यांचे अभिनंदन करत आहेत.