दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्यांच्या या कृतीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
खासदार संजय राऊतांनी यांनी या गुवाहाटी दौऱ्यावर टीका केलीय.”खोके सरकार आणि आसामचं नातं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
कामाख्या देवी ही न्याय देणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. 40 आमदार तिकडे गेलेत. आम्हाला आशा आहे की, कामाख्या देवी महाराष्ट्राला न्याय देईल, असंही राऊत म्हणालेत.