
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
काटकळंबा ता.कंधार:- मागील १० महिण्या पासुन काटकळंबा येथील विज पुरवठा वारवार खडित होत असल्याने गावकर्याने लेखी तोडी माहिती देवून याचा काही उपयोग होत नसल्याने दि १५ नोव्हेंबर रोजी कंधार महावितरण कार्यालया पुढे ग्राम पंचायतीच्या वतीने उपोषण करताच झोपलेल प्रशासन जागे होत ४ दिवसात गावचा विज पुरवठा सुरुळीत करण्याचे आश्वासन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री जाधव साहेब यानी देताच उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती सरपंच शिवाजी पा.वाकोरे यानी दिली.
कंधार तालुक्यात विज प्रश्न गंभीर झाला आहे महाविरणकडे असणारे अपूर्व मणुष्य बळ, खाजगी कारणामुळे गुत्तेदाराची मनमानी कारभार होत असल्याने विजे अभावी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे काटकळंबा येथे मागील १० महिण्या पासुन सतत डिपी जळत आसल्याने गावाकर्यासह ग्राम पंचायत हतबल झाली आहे. ग्राम पंचायतीने विज पुरवठा सुरोळीत करण्या बाबद अनेक वेळा कंधार, नादेड,बारुळ येथील कार्यालयास खेठे मारले असले तरी प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सरपंच शिवाजी पा.वाकोरे, गजानन कुठारे, भाऊसाहेब पा.पानपट्टे, माधव पा.वाकोरे, साईनाथ कोळगिरे, अशोक चावरे, गजानन पा.बस्वदे, नवाज सय्यद, नरेद्र चावरे, माधव काबंळे, वजिर पठाण यानी थेट महावितरण कंधार याना उपोषणाचा इशार दिला तरी झोपलेले प्रशासन जागे होत नसल्याने अखेर दि १५ नोव्हेंबर रोजी कंधार उपकार्यकारी अंभियाता कार्यालया पुढे उपोषण करताच नव्याने रुजु झालेले उप कार्यकारी अभिंयाता श्री जाधव साहेब यानी पुढाकार घेत ४ दिवसात गावचा विदुत पुरवठा सुरोळीत करण्याचे आश्वासन दिल्याने उपोष मागे घेतल्याची माहिती काटकळंबा ग्राम पंचायतचे सरपंच शिवाजी पा.वाकोरे यांनी दिली.