दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- चांदुर रेल्वे मार्गावरच्या चिरोडी जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या बिबट्याला भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.
वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी दाखल होताच गंभीर जखमी बिबटला त्यांनी उपचारासाठी वडाळी येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात हलविले.बिबटच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.सायंकाळीच्या वेळी गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वरदळ असल्याने अमरावतीवरून-चांदुर रेल्वेला ये-जा वाहनांची प्रचंड गर्दी असते. अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेला बिबट रस्त्याच्या मधात पडून असल्यामुळे घटनास्थळी वाहने थांबून लोकांनी गर्दी केली होती..