दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगांव- संभाजी पुरीगोसावी.
उत्तर कोरेगांव तालुक्यांच्या राजकारणात दबंग नेतृत्व असणारे आणि करंजखोप गावचे माजी लोकप्रिय उपसरपंच माननीय पिलाजी दादा धुमाळ यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहांत संपन्न. गेल्या दोन वर्षाच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उपसरपंच पदी बहुमतांनी मा.पिलाजी दादा धुमाळ यांचा विजयी झाला.सत्तेवर असताना अगदी त्यांनी तळागाळामध्ये तसेच गावातील गोर,गरिबांची कामे आणि गावच्या विकासांमध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये करंजखोप नगरीमध्ये प्रलंबित कामाना प्रथम प्रधान्य दिले. माजी उपसरपंच सौ.दीक्षा सोनवणे यांच्या समवेत त्यांनी करंजखोप गावचा कार्यभार पाहिला. सत्तेवर असो वा नसो नेहमीच गावातील विकास कामांना तसेच गोर,गरीब जनतेसाठी व आपल्या तरुण मित्रांसाठी त्यांची नेहमीच धाव असते. आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते लोकप्रिय ठरले.गावातीलच जनतेसाठी नव्हे तर अगदी पंचकोंशीतील गोर,गरीब जनतेसाठी तसेच आपल्या मित्र परिवारांसाठी धावून येणारे पिलाजी धुमाळ दादा यांचे नाव चांगलेच गाजत आहे. आज त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त पंचकोंशीतील तसेच करंजखोप ग्रामस्थ मित्रपरिवार यांनी सोशल मीडियावर व समक्ष सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी संपर्काच्या माध्यमांतून दादा पिलाजी धुमाळ यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आज दिवसभरात उत्तर कोरेगांवच्या कानाकोपऱ्यांतून आणि परिचयांतील मंडळींकडूनही दादा पिलाजी धुमाळ यांना शुभेच्छा देण्यांत आल्या यावेळी पिलाजी दादा धुमाळ यांनी सर्वांचे आभार मानले.