दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : न्यूयॉर्क,अमेरिकेतील अनेक राज्ये सध्या हिमवादळाशी झुंजत आहेत. ईशान्येकडील काही भागात बर्फाचे वादळ सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या हिमवादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून शेकडो उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. लोकांना प्रवास करण्यास विलंब होत आहे. सध्या नऊ राज्यांमध्ये आतापर्यंत किमान 48 जणांचा मृत्यू झाला आहे.