दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : चीनसह अन्य देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
चीनमधील परिस्थिती इतकी गंभीर आहे की मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी तब्बल 10 किलोमीटरची रांग लागली असल्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे.
नव्या कोरोना व्हेरिएंटने चीनमध्ये हाहा:कार माजवलाय अशात. त्यामुळे कोरोनामुळे लोकांना जीव गमावावा लागत आहे. एवढ्या लोकांचे प्राण कोरोनामुळे जात आहेत. की स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांग लागत आहे.अंत्यविधीसाठी 10 किलोमीटर लांब रांग लागल्याचीही माहिती आहे.