दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जळगाव येथे दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशन तर्फे आयोजित मिनी ऑलंपिक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी अमरावती मनपा पुरुष व महिला संघाची निवड चाचणी दिनांक २४ आणि २५ डिसेंबर रोजी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडले.सदर निवड चाचणी मध्ये प्रा.चंद्रशेखर इंगोले,प्रा.सुरेंद्रसिंग चव्हाण,डॉ.विकास येवतीकर,प्रा.वैभव अर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती मधील उत्कृष्ट १६ पुरुष व १६ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशन तर्फे आयोजित मिनी ऑलंपिक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी अमरावती मनपा पुरुष गटात अभिजीत हेमंत इंगोले,सौरभ संतोष टोकसे,प्रतीक शरद डुकरे,हर्षद उत्तमराव जळमकर,विकी सुरेशराव सैरीसे,रोहित रामधन तराळे,निखिल वैकुंठराव कडू,अभिजीत किसनराव फिरके,आशिष किसनराव झिमटे,प्रणव मोहनराव दंडाळे,वैभव अंबादास वाघमारे,मंगेश गजानन इंगोले,निखिल पंजाबराव देशमुख,उत्कर्ष बालू खुरकटे,प्रफुल सुरेश मनगटे,अंशुमन मोहनराव डोकरे तर मिनी ऑलंपिक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी अमरावती मनपा महीला गटात प्रिया उमाकांत सूर्यवंशी,पल्लवी शेषराव कोल्हे,गौरी राजेंद्र जगताप,आकांक्षा संतोष वाघमारे,सोनाली तुळशीराम चौधरी,आचाल जयप्रकाश धंदर,भूमिका सुमेध आठवले,लोकेशा हरिकिसन तायवाडे,साक्षी मोहन शिंदे,श्रद्धा अरुण तसरे,सेजल अरविंद इंगळे,गौरी दिलीप उतखंडे,मनश्री राजेंद्र वानखडे,पल्लवी हिरालाल जाधव,सलोनी अरुणराव तसरे,वैष्णवी विष्णू गिरी असे राज्यस्तरीय निवड झालेल्या पुरुष व महिला गटातील खेळाडूंची नावे असून मिनी ऑलंपिक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.
यादरम्यान अमरावती सॉफ्टबॉल असोसिएशन संघाचे अध्यक्ष डॉ.हेमंत देशमुख,डॉ.जी.वी.कोरपे,प्राचार्य पंकज गुल्हाने (श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय),संतोष सावरकर,सचिन पाटने,संतोष इंगोले व डॉ.सुरजसिंग येवतीकर (सचिव अमरावती सॉफ्टबॉल असोसिएशन) यांनी राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या पुरुष व महिला गटाच्या खेळाडूंचे यावेळी अभिनंदन केले.