दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी खटाव: संभाजी पुरीगोसावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांनी मंगळवारी रुबी हॉल क्लिनिक येथे भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेवुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी पुरेशी विश्रांती घेण्याचा आणि रात्रीचा प्रवास टाळण्याचा वडीलकीचा सल्लाही दिला. आमदार गोरे यांच्या गाडीचा शनिवारी पहाटे फलटणनजीक भीषण अपघात झाला होता. त्यांना तातडीने पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागांत दाखल करण्यात आले होते. मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा: शरद पवार यांनी गोरेची भेट घेवुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राजकारण समाजकारणांत वावरताना स्वतःची काळजी घेत चला शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा लोकांच्या सेवेत असताना वेळेची मर्यादा पाळणे अवघड असले तरी टाईम मॅनेजमेंट साठी प्रयत्न झाले पाहिजेत आत्ता दीड दोन महिने विश्रांती घेवुन लवकर बरे व्हा असा वडीलकीचा सल्लाही शरदचंद्रजी पवार यांनी गोरेंना दिला. रुबी हॉल क्लिनिकच्या वैद्यकीय पथकांशी चर्चा करुन आमदार गोरे यांच्या दुखापतींची आणि उपचारांची पवार यांनी सविस्तर माहिती घेतली यावेळी अंकुशभाऊ, गोरे सोनिया गोरे,अरुण गोरे आणि कुटुंबीय यावेळी उपस्थिंत होते.