दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे एम.डी. व सी.ई.ओ. म्हणून मुकेश अंबानी यांना आज वीस वर्षे पूर्ण झाली.
या काळात कंपनीने उलाढाल, निव्वळ नफा, विस्तार आणि बाजार मूल्य या सर्व आघाड्यांवर भरीव प्रगती केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्च २०२२ मधील भांडवली बाजार मूल्य १८ लाख कोटींच्या आसपास आले आहे. तर महसूलही आठ लाख कोटींच्या जवळपास आला आहे. या आर्थिक वर्षाचा त्यांचा निव्वळ नफा ६८ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यांची यावर्षीची निर्यात अडीच लाख कोटींच्या पेक्षा जास्त आहे. त्यांची या आर्थिक वर्षातील मालमत्ताही १५लाख कोटींच्या आसपास आली आहे.