दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना बाळासाहेबांचे शिवसेना प्रणित युवा सेनेच्या जालना सरचिटणीस पदी युवा सेनेचे सक्रिय कार्यकर्ते संतोष परळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अर्जुन राव खोतकर व युवा सेना राष्ट्रीय कार्यकारी कार्यकारणी सदस्य अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते नुकतेच संतोष परळकर यांना नियुक्त पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख गणेश मोहिते, यांची उपस्थिती होती. युवा सेनेस मागील अकरा वर्षापासून सक्रियपणे कार्यरत असलेल्या संतोष परळकर यांनी यापूर्वी एक निष्ठेने संघटनेचे कार्य केले, पक्ष संघटनेतील त्यांच्या कार्याची दखल घेत जालना शहर सरचिटणीस पदी संतोष परळकर यांची नियुक्ती करण्यात आली. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच शिवसेना सचिव संजय मोरे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या आदेशानुसार सदर नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्र्याचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष हिताचे काम करावे, असे त्यांना दिलेल्या नियुक्तीपात्रामध्ये अभिमन्यू खोतकर व भाऊसाहेब घुगे यांनी नमूद केले. त्या नियुक्ती बद्दल संतोष परळकर यांचे पदाधिकारी शिवसेनेत व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.