दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी दिल्ली- संभाजी पुरीगोसावी.
देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या आईसाहेब हिराबेन मोदी यांनी आज पहाटे वयांच्या १०० वर्षी अमदाबादमधील केयुन मेहता रुग्णालयांत त्यांनी अखेरचा श्वांस घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे मोदी कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला. तसेच राजकीय क्षेत्रातील तसेच देशभरातून अनेक मान्यवरांनी टूविंट वरुन दुःख व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली. मोदी यांच्या मातोश्री बुधवार (दिनांक 28 डिसेंबरला) त्यांची तब्येत खालावली होती आणि त्यांना अहमदाबादमधील केयुना मेहता रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी टूविट करून त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली यावेळी ते पुढे म्हणाले…. शंभर वर्षाचं आयुष्य आता ईश्वरांच्या चरणी लीनं झाले आहे. तिचा प्रवास एका तपस्वीसारखा होता. ती निष्काम कर्म योगाचं प्रतीक होती. आणि तत्वांशी एकनिष्ठ होती. मी माझ्या आईला तिच्या १०० व्या वाढदिवशी भेटलो तेव्हा तिने एक गोष्ट मला सांगितली… जी नेहमी लक्षांत राहिली ती म्हणजे बुद्धिंमत्ता वापरुन काम करायचे आणि शुद्धतेने जीवन जगायचे दरम्यान पंतप्रधान मोदी सकाळीच गांधीनगराला पोहोचले त्यांनी आई हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि अंत्यसंस्कारांच्या विधीत सहभाग नोंदवला… आता माझ्या आयुष्यांत जे काही चांगले आहे माझ्या व्यक्तिमत्त्वांत जो चांगुलपणा आहे तो माझ्या आई-वडिलांमुळेच आहे. येथे दिल्लीत असताना कितीतरी जुन्या गोष्टी आठवत आहेत… माझ्या आईच्या निधनामुळे आज देशभरांतील तमाम जनता माझ्या आईच्या दुःखामध्ये सहभागी आहे असे पंतप्रधान मोदीजी म्हणाले… यावेळी महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुढे म्हणाले… आजची पहाट ही अत्यंत दुःखदायक ठरली. पंतप्रधान नरेंद् मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्यांचे बातमी ऐकून तीव्र दुःख झाले आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखांत सहभागी आहोत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह देशभरांतील राजकीय क्षेत्रांतील मान्यवर मंडळी तसेच तमाम जनतेकडून मोदींच्या मातोश्री यांच्या निधंनामुळे अनेकांनी ट्विट वरुन व सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपले दुःख व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली.