दैनिक चालु वार्ता मोताळा प्रतिनिधी -गणेश वाघ:- तालुक्यातील नळगंगा धरण येथे नागेश्वर महाराज यात्रा महोत्सव आयोजित अखंड हरिनाम सप्ताह वै.शशीकांत बाबा यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीरामचरित्रदास तुलसी रामायण कथेचे आयोजन ४ ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये दररोज सकाळी काकाडा आरती सहस्त्रनाम, सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम, रामायण कथा ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ या दरम्यान नंतर सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरिकिर्तन पार पडले. यामध्ये रामयण कथा वाचक हभप वासुदेव महाराज शास्त्री, वाघजाळ आश्रम यांच्या मुखातून सात दिवस वाचन झाले. यामध्ये ४ जानेवारी रोजी किर्तनकार हभप.राजू महाराज घोनखेड, ५ जानेवारी रोजी हभप.मधुकर महाराज निपाणा, ६ जानेवारीला हभप.पुंडलिक महाराज पिंप्री गवळी, ७ जानेवारीला हभप.महादेव महाराज खोडके भाडगणी, ८ जानेवारी रोजी हभप.शिवाजी महाराज काबरखेड, ९ जानेवारीला हभप.मोहन महाराज लासुरा, १० जानेवारीला हभप.गोपाल महाराज कचोरे डिडोळा, व ११ जानेवारी सकाळी दिंडी सोहळा नंतर दुपारी काल्याचे किर्तन हभप.वासुदेव महाराज शास्त्री वाघजाळ आश्रम यांच्या किर्तन व त्यानंतर महाप्रसादा कार्यक्रमाने यात्रा महोत्सव सांगता करण्यात आली. यामध्ये पिं.पाटी, भोरटेक, तळणी, शेलापूर, डिडोळा, सांगळद, काबरखेड पिप्रीं गवळी, मोताळा, बुलढाणा सह परिसरातील भाविक मंडळींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. शेवटच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी भेट दिली. यामध्ये आठही दिवस कार्यक्रमांची चांगलीच रेलचेल राहली.