दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे दि. बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष आणि पुण्यातील माशांचे व्यापारी पंडित भाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून बहुजन जनता दल आणि महिला आघाडी युवा आघाडी वैद्यकीय कामगार आघाडी व फिल्म सिटी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 ते 22 जानेवारी 2023 पर्यंत राज्यात सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
यामध्ये बहुजन जनता तर आणि बहुजन जनता दल फिल्म सिटी आघाडीच्या वतीने नागपूर येथे पंडित भाऊ दाभाडे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त 53 केक कापण्याचे कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दल नागपूर जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार. संपर्क नेते अश्विन चांदुरकर फिल्म सिटी अध्यक्ष शिवाजी थोरात यांनी केले आहे
. बहुजन जनता दल रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने देशभक्तीपर आणि भिम बुद्ध गीत कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दल रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मंगेश काळे यांनी केले आहे
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे बहुजन जनता दल महिला आघाडीच्या वतीने बस स्टैंड वर रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या नागरिकांना भोजनदानाचे आयोजन बहुजन जनता दल पंढरपूर शहर महिला आघाडी अध्यक्ष अलकाताई राखेवार यांनी केले
औरंगाबाद जिल्हा बहुजन जनता दल जिल्हा शाखेच्या वतीने पैठण रोड वरील श्रीकृष्ण सोसायटी येथे समाज प्रबोधन किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दलाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष राजाराम गावंडे पाटील यांनी केले.
बहुजन जनता दल जिल्हा जालना शाखेच्या वतीने पंडित भाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त15 जानेवारी 2023 रोजी जालना येथील शासकीय रुग्णालय येथे जन्माला आलेल्या नवजात बालकांना नवीन कपडे आणि मातेला साडी चोळी देऊन सन्मान करण्यात येणार या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दल जालना जिल्हा शाखेचे अध्यक्ष शरद रणपिसे यांनी केले.
बहुजन जनता दलाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे तहसील कार्यालय चौक येथे फळाचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दलाचे पाचोरा तालुका अध्यक्ष शंकर सोनवणे यांनी केले आहे.
. सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे बहुजन जनता दल महिला आघाडी च्या वतीने तिळगुळ आणि हळदी कुंकाचे या कार्यक्रमाचे आयोजन शिरवळ शाखा अध्यक्ष सौ नीताताई पाटील यांनी केले आहे
अशा प्रकारे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त बहुजन जनता दल आणि सर्व आघाडी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राज्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे बहुजन जनता दलाचे गिरीश माने किशोर सुतार नंदकिशोर चौधरी मंगेश अवतर दीपक सुरवाडे किशोर चौधरी दीपक पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे धनराज पाटील किशोर कदम याकुब शाहा महेंद्र जाधव यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाच्या क कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे