दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- पुणे येथे महाराष्ट्र थोडा स्पोर्ट असोसिएशन इंडिया व राजस्थान थोडा स्पोर्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच घेण्यात आलेल्या नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेत (मौजे पाडोळी ता.भूम) प्रतीक्षा लक्ष्मण कोकरे हिने सुवर्णपदक मिळविले. प्रतीक्षा कोकरे ही सर परशुरामभाऊ विद्यालयात शिक्षण घेत आहे. तिला मनोज ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष ललित ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.