दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
पुणे – बंडगार्डन
बंडगार्डन पोलीस ठाण्यातील बीट मार्शल हद्दीत पेट्रोलिंग करीत असता त्यावेळी तुकाराम शेठ पीएमपीएल बस स्थानक, पुणे रेल्वे स्थानकाजवळ तरुणाचा मोबाईल फोन जबरीने चोरी करून दुचाकीस्वार चोरटा पळून जात असल्याची माहिती बीट मार्शल ज्ञानेश्वर गायकवाड, विलास केकान यांना मिळाली. त्यांनी शिताफीने पाठलाग करून आरोपीला पकडण्यात यस आले त्याच्याकडे तपास करून दोन वाहनचोरी आणि मोबाईल हिसकावून नेण्याचा असे तिन गुन्हे उघडकीस आले आहे.
बिट मार्शलांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे जबरी चोरी आणि वाहन चोरीतील आरोपीला अटक करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे.
रोहित राजेंद्र काकडे (वय 24, रा. गंगानगर कॉलनी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी एन. राजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे सुधीर घोटकुले, अमोल सरडे, शंकर संपते, अनिल कुसालकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय वनवे यांनी केली.