दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा नगरीचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या दि. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
तसेच नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे की, यंदा २६ रोजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत ते सध्या कौंटुबिक दुःखात आहेत त्यांचे वडील सुभाष सावकार सुर्यवंशी यांचे दि. 29/12/2022 रोजी निधन झाले असल्याने सुर्यवंशी कौंटुबीय या वर्षी कोणताही कार्यक्रम साजरा करणार नाहीत.
तेव्हा दि. २६ जानेवारी रोजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही ही कुणाच्याही शुभेच्छा स्वीकारणार नाहीत.
त्यांच्या असंख्य चाहत्यांनी यांची दाखल घ्यावी व बॅनरबाजी, किंवा वाढदिवसानिमित्त कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करु नये असे आवाहन नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.