दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:शेटफळ हवेली येथील संतोष बनकर यांच्या मातोश्री सुनंदा धनाजी बनकर यांचे दिर्घ आजाराने रविवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७० वर्षे होते.
त्यांच्या पार्थिवावर २२ जानेवारी २०२३ रविवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनंदा बनकर यांचा स्वभाव खूप कष्टाळू आणि मनमिळाऊ होता, त्या खूप जिद्दी होत्या. त्यांनी कधीच कोणत्या गोष्टींमध्ये हार मानली नाही परंतु पाठीमागील काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. या काळामध्ये त्यांचा मुलगा संतोष बनकर यांनी आपल्या आईची खूप जिवापाड सेवा केली ते विविध ठिकाणी आपल्या आईला उपचारासाठी घेऊन जात होते, परंतु त्यांना यामध्ये यश आले नाही, आणि अखेर रविवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला इंदापूर तालुक्यातुन मोठा जनसमुदाय उपस्थित होता.