दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
इंदापूर तालुका पत्रकार संरक्षण समितीचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य श्री.बापूसाहेब महाराज देहूकर व प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंदरे, श्रीमंत ढोले, सागरबाबा मिसाळ यांच्या हस्ते पत्रकार बांधव, समाज सेविका, आशा सेविका, डॉक्टर व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचे व इतर मान्यवर यांचा सन्मान सोहळा करण्यात आला,
नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील पत्रकार संरक्षण समितीच्या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की,,
पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्कृष्ट चांगल्या प्रकारे केल्यामुळे सर्वच पत्रकार आणि संयोजकाचे यावेळी अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.
पत्रकाराच्या प्रबोधनाचे काम येत आसताना जिथे जिथे अन्याय होत आसतो त्या त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार बांधवच करतात.गरीब माणसाला केंद्रबिंदू माणुन जर त्यांच काम केले तर गरीब माणसे विसरत नाहीत. पत्रकारांच्या लिखणीतून गरीब माणसाला कशी मदत मिळवता येईल व गरीबाचे काम कस होईल याकडे लक्ष घालावे गरीब माणसाला मदत करा जो दुःखी आहे त्याचे काम करा त्याचे पुण्य पत्रकार बांधवांना चांगले मिळेल.
माझ्या पत्रकार बांधवांन पासुन गरिबांना हक्कही मिळवता यतो. सर्व समाज पत्रकाराकडे चांगल्या दिशेने पहात आहेत. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पत्रकार सन्मान सोहळ्या निमित्त उद्गार,,
ह.भ.प.गुरुवर्य बापूसाहेब देहूकर,, यांनी पत्रकारांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. तसेच पत्रकार संरक्षण समितीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून नेत्यांकडून व शासकीय अधिकाऱ्यांकडून आलेल्या शुभेच्छा बद्दल तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी गुरुवर्य बापूसाहेब देहुकर माजी राज्यमंत्री दत्ता मामा भरणे,, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका अध्यक्ष सागरबाबा मिसाळ,, संचालक हरिभाऊ घोगरे,, श्रीमंत ढोले, नवनाथ रुपनवर, संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंदरे, राज्य संघटक अनिल चौधरी, संपादक राधेश बांधले, रवींद्र खुडे, सरपंच चंद्रकांत सरवदे, उपसरपंच आनंद काकडे, पांडुरंग डिसले, दादासाहेब शिरसागर, सरपंच शितल मोहिते, विजय सरवदे, शरद बोडके, हरिभाऊ सुतार, भीमराव मोरे, संदीप मोहिते, डॉक्टर कुमार लोंढे, गणेश भोसले, वकील संतोष शिंदे, कल्याण बंडलकर, अध्यक्ष बाळासाहेब सुतार, उपाध्यक्ष धनाजी शेंडगे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ सरर्वदे, सचिव सतीश जगताप, समाधान रजपूत, संदीप क्षीरसागर, मल्हारी लोखंडे, सौरभ सुतार, आमोल चिकने, सलीम शेख, सर्व भागातून आलेले आजी-माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य ग्रामसेवक तलाठी आणि ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्यातून व इतर सर्व जिल्ह्यातून सर्वच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिल्याबद्दल पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने
सर्वांचे स्वागत करून सत्कार सोहळा संपन्न केला,
लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमी येथे 155 हुन अधिक पत्रकारांचा पुरस्कार व सामाजिक क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पन्नास हून अधिक महिलाचा व ग्रामस्थांचा सन्मान सोहळा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कोकाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सिद्धार्थ सरर्वदे यांनी मानले
———————————–