दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-सुरेश जमदाडे
मुखेड येथील राजे छत्रपतीअकॅडमी
येथे केमिस्ट असोसिएशन च्या कार्यक्रमादरम्यान आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांनी नामांकित राजमाता जिजाऊ होस्टेल च्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद.नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले राजमाता जिजाऊ हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिस्त संस्कार, आणि वेगवेगळ्या,शैक्षणिक उपक्रमामध्ये नेहमी सहभागी होणारे, कमीत कमी दिवसांमध्ये उंच शिखरावर पोहोचणारे व शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेणारे,राजमाता जिजाऊ हॉस्टेल म्हणून ओळखले जाते. या नामांकित हॉस्टेलच्या
मुलांशी संवाद साधून त्यांच्याशी हितगुज केले. व नंतर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यश मिळवावे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे जिद्दीने आपले ध्येय साध्य होईपर्यंत नेहमी प्रयत्नशील राहावे. तसेच या जिजाऊ हॉस्टेलचे संचालक जे अहोरात्र मेहनत करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतात, गोरगरीब वाडी तांड्यावरील, विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश देऊन सर्वांगीण शिक्षण देतात. अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, संचालक बिरादार सरांचे आमदार साहेबांनी विशेष अभिनंदन केले.
व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तेव्हा श्री मेडिकलचे राम पाटील, निखिल भाऊ काळे, महेश देशमुख, इतर विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.