दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा देगलूर बिलोली विधानसभा सोशल मिडीया अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर यांनी लातूर येथे केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांची भेट घेवून विविध प्रश्नावर विस्तृत चर्चा केली. यावेळी रुपेश पाटील यांनी सोशल मिडीयाव्दारे कॉंग्रेसची विचारधारा तळागाळतल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात प्रभावी काम करत असल्याबद्दल व समाजमाध्यमातून कॉंग्रेस विरोधी विचारचरणीला सडेतोड उत्तर देत कॉंग्रेसची ध्येय धोरणे गावपातळीवर नेत आहोत अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी रुपेश पाटलांच्या कार्यशैलीवरसमाधान व्यक्त करुन अधिकचे मार्गदर्शन यावेळी केले.