दैनिक चालु वार्ता हातकणंगले- कवि सरकार इंगळी
हे खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते ज्ञानाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके हे राष्ट्रपती पोलीस पदक विजेते असून अनोखे कविसंमेलन ते नेहमीच करत असतात
पुणे आळंदी विश्रांतवाडी येरवडा बिबवेवाडी ससाणेनगर भेकराईनगर सातवनगर हडपसर येथील नामवंत कवी कवियत्रीचा सहभागी होते कविसंमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांनी भूषविले असून प्रमुख पाहुणे मकरंद घाणेकर
व दशरथ केदारी माजी पोलीस अधिकारी हजर होते
काळजाच्या भावना प्रगट करतो
तो खरा कवी असे उदगार
कविसंमेलन अध्यक्ष ग्रामीण कविवर्य चंद्रकांत जोगदंड यांनी आपले मनोगत प्रगट केले असून
प्रेम विरह जन्म मृत्यू आई बाप प्रेयसी संत धर्म पंथ वैचारिक मंथन करणारे साहित्यिकांनी आपल्या रचना सादर करू रसिकांची मने जिंकली
ज्येष्ठ गझलकार बबन धुमाळ ससाणेनगर आनंद गायकवाड येरवडा दिपाली खामकर भेकराईनगर विजय माने काळेपडळ प्रीती आबनावे सातवनगर प्रसन्नकुमार धुमाळ ससाणेनगर हभप बडदे महाराज वानवडी गिरीष जाधव विमाननगर रामदास हिंगे आळंदी
यांच्या बहारदार रचना सादर झाल्या ज्ञानाई फाउंडेशनचे सभागृहात प्रचंड टाळ्यांच्या गजरात इतिहास रचला गेला तसेच प्रामुख्याने उपस्थित असलेले पोलीस अधिकारी दशरथ केदारी साहेबांनी व निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांच्या शुभहस्ते लोककवी सीताराम नरके साहेब यांचा पुष्पगुच्छ श्रीफळ शाल धनादेश देवून सत्कार करण्यात आला ते बोलताना म्हणाले कि आज हा सत्कार माजी आजी महाराष्ट्र पोलीस मित्र मंडळग्रुप आयोजित स्नेहसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचलनासाठी हा मानधनाचा धनादेश देण्यात येत आहे असे त्यांनी जाहीर केले
त्या कार्यक्रमाला मुंबई हायकोर्टाचे सर न्यायाधीश मा संजय देशमुख साहेब हजर होते असे त्यांनी सांगितले
मकरंद घाणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून दोन रचना सादर केल्या
या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांच्या ओघावत्या शैलीतून शीघ्र चारोळ्या सादर करून एकांत अस्तित्व विरह चंदनाचा या रचना सादर केल्या
कविसंमेलनाची सांगता लोककवी सीताराम नरके साहेब यांनी आपल्या आई बाप कन्यारत्न पत्नी अशा रचना सादर करून रसिकांची मने जिंकली
पसायदान सादर करून कविसंमेलनाची सांगता झाली