दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर/जव्हार: तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी हद्दीतील हाडे(देवीचापाडा) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या पुढाकाराने रोपवटीका तयार करण्यात येणार असून या रोपवाटिकेच्या माध्यमातून स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळणार असून योजगराची उपलब्धता होणार आहे.खरीप हंगामाला अद्याप पाच महिने शिल्लक असल्याने या कालावधीत आंबा,काजू,खैर,साग,करंज अश्या विविध प्रकारच्या अनेक जातींच्या रोपांची या रोपवाटिकेत लागवड करून पावसाळ्यात शेतकऱ्यांना फळझाड लागवडीच्या माध्यमातून रोपे तयार करण्यापासून ते लागवड करण्यापर्यंत रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.त्यामुळे काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्न मिटणार असून आर्थिक दृष्ट्या या मजुरांना हातभार लागणार आहे.या रोपवाटिकेच्या उद्घाटना प्रसंगी जव्हार पंचायत समितीचे माजी उपसभापती सीताराम पागी,माजी सदस्य विनायक राऊत,ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुलोचना चौधरी,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामरोजगार सेवक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.