दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
कोकण विधान परिषदेचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळाराम पाटील यांचा भाजप,शिंदे गट, आरपीआय युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मोठ्या फरकाने पराभव करून भाजप शिंदे गट युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाल्याने कोकण पदवीधर मतदार संघात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.नवनिर्वाचित आमदार म्हात्रे यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांचे विजयाचा जल्लोष म्हसळा तालुका भाजप ,बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट युतीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी फटाके वाजवून, पक्षाचे झेंडे फडकावून,विजयी घोषणा देत साजरा केला. विजयाचा जल्लोष साजरा करताना भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर,चिटणीस महेश पाटिल,अल्प संख्यांक ता.अध्यक्ष समिर समीर धनशे,दिनेश काप,प्रवीण ऊर्फ बाबु बनकर,सरपंच लहूजी तुरे,मनोहर जाधव,सुबोध पाटील,शरद कांबळे,शिंदे गट शिवसेना तालुका अध्यक्ष प्रसाद बोर्ले,अमर करंबे, मंगेश देवे,हरी नाक्ती,दिपेश जाधव,अरविंद शिंदे
भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०६४८ मत मिळाली तर विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना अवघ्या ९७६८ मतांवर समाधान मानावे लागले.कोकण विधान परिषदेचे पदवीधर मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांचा दारूण पराभव महाविकास आणि शेकापच्या जिव्हारी लागला असल्याचे निदर्शनास येत आहे.