दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/गंगाखेड : तालुक्यातील श्री क्षेत्र धारासूर नगरीत महाशिवरात्रीच्या पूण्य पावन पर्वावर साक्षात भगवान शिव शंकराने सांगितलेल्या कथेवर आधारित कलियुगातील सर्वोत्तम भव्य श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आले आहे. याच दरम्यान भाविक भक्तांना सूश्राव्य कीर्तनाचा लाभ घेता यावा यासाठी अखंड हरिनामाच्या सप्ताहाचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे.
तालुक्यातील श्री गुप्तेश्वरांच्या पूण्याईने पूनित धारासूर नगरीत त्याच औचित्यावर महान असे विविध ह.भ.परायणकार व कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत. त्यात ह.भ.प. प्रकाश महाराज मुळे यांचे रविवार, दि.१२ फेब्रुवारी रोजी; सोमवार, दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी केशव महाराज घुले (शास्त्री) यांचे भव्य असे कीर्तन, मंगळवार, १४ फेब्रु.रोजी ह.भ.प.बाळू महाराज ऊखळीकर, बुधवार, १५ फेब्रु. रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज चौरे, गुरुवार, १६ फेब्रु. रोजी ह.भ.प. अच्यूत महाराज दस्तापूरकर, शुक्रवार,१७ फेब्रु. रोजी ह.भ.प. नामदेव महाराज फपाळ, शनिवार, १८ फेब्रु. रोजी ह.भ.प.अर्जून महाराज धारासूरकर तर रविवार, १९ फेब्रु. रोजी ह.भ.प. माऊली महाराज मुडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. अधिकाधिक भाविक भक्तांनी या शिव महापुराण कथेचा आणि सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांचे करण्यांत आले आहे.