दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. सरकार म्हणतंय सर्वाना पक्के घर देणार गुरांना गोठा, शेतकऱ्यांना विहीर, मागेल त्याला काम,पण सध्या परिस्थिती मात्र वेगळीच दिसत आहे. काही गावामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गटातटाचे राजकारण करून सामान्य जनतेचे काम अडकवून वेठीस धरून विलकक्षचा वचपा काढत आहे असं वाटत सामान्य नागरिकांच्या ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजत अडथळा निर्माण करण्यात येत आहे गटातताच्या राजकारणामुळे शासनाचा योजना गोरगरीब जनतेचे घरकुल, गोठा, विहीर इतर योजनेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयासमोर न लावने.ज्याचे घरकुल आले त्याने कागद पत्राची पूर्तता करून प्रस्ताव दाखल करून काम होऊ न देन काहीच घर बांधून बिल निघू देईना अशा जनतेच्या कामात काड्या करण्याचा गावपुढाऱ्याचा काम चालु आहे अशा सत्ता पिसाट लोकांमुळे असा खेळ गावागावात चालु आहे यांच्या वादात कर्मचारी मंडळी सामान्य जनतेची पिळवणूक करीत असून घरकुल पूर्ण होऊन कागद पत्राची पूर्तता करून नवीन प्रस्ताव दाखल करून घरकुलाचे बिल निघत नाही म्हणून नागरिक त्रस्त कर्मचारी मात्र बिनधास्त दिसत आहे. 🎆(चौकट ) *ग्रामनिधी हडप करण्यास सत्ताधारी विरोधक व कर्मचारी एकत्र येऊन* पूर्वीचे पुढारी जिगरबाज होत कोणतीही परिस्थिती येऊ दया सोडत नव्हते हात. आताचे गावपुढारी स्वार्थासाठी कोणत्याही अंगाडावर झोपायला तयार झाले आहे.पैस्यासाठी राजकारणी पुढारी कोणत्याही थरला जायला तयार असून त्यात शासकीय कर्मचारी माघें नाही राहिले .गावपुढारी विलक्षण काळात एकमेकांना खालच्या स्तरावर बोलून शेणात बुडून काढून सुद्धा एखादानिधी हडप करण्यासाठी किंवा आपल्या बुडाखालचा अंधार झाकण्यासाठी त्याचे एकत्र येऊन एखादे फायदयचे काम बोगस करून बिल हडप करण्यासाठी सर्व निकष गट तट विसरून सरकारी अधिकाऱ्यांना मॅनेज करून भ्रष्टाचार चालूच आहे मात्र सामान्य गरीबाच्या शासकीय कामासाठी,घरकुलासाठी निकष, नियमावली अधिकरी दाखवतात मात्र पुढाऱ्यासाठी काही नियम पायाखाली तुडून त्याचे काम होत. गरीबा करिता तुमचं त्यांचं जमत नाही म्हणता ग्रामनिधी गिळण्यास सत्ताधारी विरोधी अधिकारी एकत्र येता.
🎆ग्रामसेवक मुख्यालई राहतात म्हणून ठराव घेता बनावट शासनाच्या मुख्यालई राहण्याच्या आदेशाला ग्रामसेवक ठेंगा दाखवत आहेत.अशा अनेक गावात ग्रामसभा घेत नसून मुख्यालई राहतो असा बनावट ठराव घेत असून गावाची सरकारची दिशाभूल ग्रामसेवक करीत आहे गावात महिण्यातून एकदा पण तोड दाखवत नाही. सामान्य गरीब माणसाला ग्रामपंचायत स्तरावरील कामाला तालुक्याला जावे लागत आहे. घरकुलाला कामाला टाळाटाळ करून म्हणता आहे अर्धवट तुमचा ठराव पण नाही का बनावट.
🎆सामान्य माणसाला दडपण्याचा प्रयत्न
सध्या गावपुढाऱ्याकडून सामान्य माणसाला त्याने आवाज उठवला पाणि सुटत नाही, नाली भरली, माझं हे काम होत नाही ते काम होत नाही माझं घरकुल बिल का निघालं नाही याची वरिष्ठाकडे तक्रार केली तर त्याच्यावर कुंभाड रचून त्याला त्याच्यावर आरोप घालून बदनाम करून स्वतःचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी सामान्य माणसाला दडपण्याचं काम गाव खेड्यात चालु आहे.