दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- कौठा ता.कंधार येथे दि.१ फेब्रूवारी २०२३ रोजी बुधवारी सकाळी १० वाजता धन्वंतरी क्लिनीक येथे आझाद ग्रूपचे नांदेड जिल्हाअध्यक्ष श्री.प्रभाकर पांडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री.भिमाशंकर मामा कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन केंद्रप्रमुख श्री.दिनकर सर,लोहा तालुकाध्यक्ष आझाद ग्रूपचे श्री.रुद्रा पाटील भोस्कर यांच्या हस्ते झाले.या शिबीराला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.कौठा गावातील नागरिक व कौठा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिराला डॉ.स्वप्नजा चांडोळकर,डॉ.किरण ठाकरे,डॉ.अपर्ना देवसरकर,व डॉ.विवेक देवसरकर यांच्या सहकार्याने मोफत सर्व रोगनिदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते.या शिबीराला उपस्थित मान्यवर कौठा केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री.दिनकर सर, आझाद ग्रुप चे लोहा तालुका अध्यक्ष श्री.रुद्रा पाटिल भोस्कर, श्री.सोमनाथ कापसे,मा.तंटामुक्ती अध्यक्ष श्री.बाबुराव देशमुख,मा.ऊपप्राचार्य श्री.किशनराव सुंडगे,सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री.शंकरराव देशमुख,चेअरमन श्री.प्रताप देशमुख, श्री.बसंवतराव देशमुख, श्री किशनराव हत्ते,तलाठी श्री.सतिश देशमुख, श्री.बालाजी पांचाळ, श्री.भिमराव पाटिल, श्री.विनोद गवते सर, लोकनियुक्त सरपंच लांडगेवाडी तथा मराठवाडा संघटक आझाद ग्रुप श्री.बाळासाहेब टोपारे, श्री .प्रसाद भाऊ पोले, श्री.बसवंत बारलावार, श्री.रामदास कापसे, श्री बळीराम इंदोरे, श्री.खुशालराव कापसे , श्री.शिवशंकर देशमुख, श्री.सोमनाथ कापसे गावातील प्रतिष्ठित नागरिक व आझाद ग्रुप चे पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांच्या उपस्थितीत पत्रकार तथा जिल्हाअध्यक्ष प्रभाकर पांडे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन.लवकरच येणार्या काळात कौठा सर्कल मधुन जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेतुन निवडुन यावे म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या.