दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड येथील भाजपा युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष तथा आमदार डॉ.तुषार राठोड यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अमरसिंह ठाकुर रा. राजा दापका यांनी काही कामानिमित्त मुखेडहुन मोटारसायकलने कंधार येथे जात असताना वसंतनगरच्या पुढे रानडुक्करांने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत अमरसिंह ठाकुर यांच्या डोक्याला जबर मार लागला होता त्यामुळे त्वरित त्यांना नांदेड येथे हालविण्यात आले होते. पण काल सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने मुखेड तालुक्यावर एकच शोककळा पसरली होती. अमरसिंह ठाकुर यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्वांकडून अमरसिंह ठाकुर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.तर दुसरीकडे मात्र स्वभावाने प्रेमळ व एक सच्चा कार्यकर्ता गमावले असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून ऐकावयास मिळत होते. अमरसिंह ठाकुर त्यांचा अंत्यविधी दि. २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळ गावी राजा दापका येथे पार पडला असून यावेळी मुखेड तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते , मित्रमंडळी व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते , गावातील व आजूबाजूतील असंख्य नागरिक अंत्यविधीला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.