दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक – मोहन आखाडे
भाजपचे शर्थीचे प्रयत्न धुळीला, औरंगाबादमध्ये मविआचाच ‘विक्रम काळे विजयी
औरंगाबाद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अखेर जाहीर झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा आता झालीय. विक्रम काळे हे सकाळपासून आघाडीवर होते. अखेर या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. विक्रम काळे यांनी या विजयातून चौख्यांदा विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. विक्रम काळे यांच्या या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष केला जातोय. या निवडणुकीत विक्रम काळे यांना 20 हजार 195 मतं मिळाली. तर भाजपचे किरण पाटील यांना 13 हजार 570 मतांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे भाजपने औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. पण तरीही भाजपच्या पदरात अपयश आलं आहे.
मला हरवण्यासाठी भाजप व इतरांनी पैसे देऊन उमेदवार उभे केले मात्र माझा विजय निश्चित आहे”, असंदेखील विक्रम काळे यावेळी म्हणाले होते.
“मतांचं विभाजन झालं. जुनी पेन्शन योजना, शंभर टक्के विना अनुदान शाळांना अनुदान मिळवून देणे हे दोन महत्त्वाचे विषय होते. त्या मुद्द्यावरुन मतांचं विभाजन झालेलं दिसतंय’, असं विक्रम काळे यांनी सांगितलं होतं.