दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर;देगलूर येथील उदगीर रोडवरील शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठवड्यात दरोडा टाकून महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात यापूर्वीच मुखेड तालुक्यातील चार व एक उदगीर तालुक्यातील अशा पाच आरोपींना देगलूर पोलिसांनी अटक केली होती. सहाव्या आरोपीस पुण्यातील पिंपरी- चिंचवड भागातील हिंजेवाडी येथून अटक करण्यात आली असून तोही मुखेड तालुक्यातील रहिवासी आहे.
या सहाही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसाची म्हणजे येत्या (ता.पाच) फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ता. २३ जानेवारी रोजी उदगीर रोडवरील शास्त्रीनगर मध्ये मूळ येडूर ता. देगलूर येथील रहिवासी असलेले श्रीपतरावपाटील व त्यांची पत्नी चंद्रकलाबाई पाटील हे घरी असताना त्यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधून चार लाखाचा ऐवजी घेऊन पोबारा केला होता. यावेळी झालेल्या झटापटीत श्रीपत पाटील यांची पत्नी चंद्रकलाबाई पाटील यांची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती.
या हत्या प्रकरणात देगलूर पोलिसांनी सहावा आरोपी साईनाथ नागनाथ मामीलवाड (वय २८) रा. अंबुलगा ता. मुखेड याला पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील हिंजेवाडी येथून ताब्यात घेतले आहे. या सर्व सहा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसाची येत्या (ता. पाच) फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे हे करीत आहेत.