दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा वाटूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग प्रमाणित शेतकरी मेळाव्यास मुख्यमंत्री आले असता शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन
देण्यात आले शेतमालाला हमी भाव ,वायदे बाजारत कापूस तूर सोयाबीन व इतर पिकांचा समावेश करावा, जी एम बियाण्यांच्या चाचण्यांना परवानगी देण्यात यावी , कृषी उत्पन्न बाजार समितीतून धान्य कडधान्याची नियमन मुक्ती करावी तसेच मार्केट सेस व हमालनच्या व मापऱ्यांच्या जाचातून शेतकरी व व्यापाऱ्यांना मुक्त करावे सक्तीची कर्ज वसुली त्वरित बंद करावी
अतिवृष्टीच्या
नुकसानीचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे
पीक विम्याची रक्कम त्वरित वाटप करण्यात यावी
परतुर तालुका लोअर दुधना प्रकल्पातील बावीस गावांच्या अतिरिक्त पाचशे हेक्टर जमिनीचा मावेजा मिळवा अशा विविध मागण्या या निवेदनात शेतकरी संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेले आहेत तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याकडे त्वरित लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत अशी मागणी करण्यात आली. या वेळी जालना जिल्हा अध्यक्ष श्री उत्तम त्र्यंबक काळे घनसावंगी तालुका अध्यक्ष विश्वंभर भानुसे मंठा तालुका अध्यक्ष ज्ञानदेव काकडे परतुर तालुका श्री संतोषराव खराबे नितीन देशमुख ज्येष्ठ नेते पुंजाराम सुरुंग तसेच महादेव काकडे,विष्णू शिंदे गणेश काकडे,संतराम राजबिंडे , गजानन भांडवले इत्यादीच्या स्वाक्षऱ्या होत्या.