दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
भूम :- देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्या स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक सैनिक सरहदीवर शत्रूवरती निशाणा लावून असतो, यापुढे युवकांनी देश सेवेत वाहून घेणे काळाची गरज आहे असे मत माजी सैनिक राष्ट्रीय समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिदास शिंदे यांनी सेवानिवृत्त सैनिकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना केले.
गुरुवार दि 2 फेब्रुवारी 2023 रोजी आष्टा तालुका भूम येथील सुभेदार प्रमोद जाधव हे सैन्य दलात 28 वर्ष 28 दिवस सेवा करून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांनी वाजत गाजत तालासुरात देश देशभक्तीपर घोषणा देत प्रमुख मार्गाने स्वागत पर मिरवणूक काढली. शालेय विद्यार्थिनी लेझीम वर ठेका धरत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य असा स्वागत समारंभ केला.
यावेळी माजी सैनिक सुभेदार प्रमोद जाधव यांच्या वयोवृद्ध मातोश्रींनी देखील माझ्या मुलाला देश सेवेसाठी पाठवलं होतं, यापुढे प्रत्येक महिलांनी सुद्धा आपल्या मुलाला देश सेवेसाठी पाठवावं असं आवाहन केलं. या दरम्यान सेवानिवृत्त सुभेदार प्रमोद जाधव यांच्याबरोबरच त्यांच्या सौभाग्यवती, मुलाचा, मुलींचा देखील उपस्थित सर्वांनीच अगदी अंतकरणपूर्वक सन्मान करून स्वागत करून त्यांच्या भविष्यातील उर्वरित आयुष्याला शुभेच्छा दिल्या.
सैनिक समाज पार्टीचे जिल्हा धाराशिव जिल्हाध्यक्ष हरिदास शिंदे, उपाध्यक्ष शहाजी गोरे, धाराशिव तालुकाध्यक्ष गपाट, भूम तालुकाध्यक्ष हेमंत देशमुख, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रल्हाद कुटे, शहर संघटक शहाजी पगारे , संघटनेचे प्रवक्ता विधिज्ञ भगवान नागरगोजे, कानिफनाथ मोराळे, प्रभाकर औताडे, हनुमंत मस्कर, राजाराम वाघमारे, सिराज मुजावर , शिवाजी पेंडपाले, राजेंद्र फारणे, शिवाजी चव्हाण, सुदाम शेलार, पांडुरंग खोसे, भारत बोराडे, बाळासाहेब लोखंडे, अभिमन्यू जाधवर, दत्तात्रय गिलबिले, डी एस जाधव, तात्यासाहेब सूर्यवंशी साहेब, भारत गुंजाळ, दासू पवार, श्रीकांत चव्हाण माजी सैनिक मित्र पत्रकार शंकर खामकर, प्रमूख पाहूणे पै.नवनाथ आप्पा जगताप, पै विशाल नाना देवकर,सरपंच नितिन डोके, मनोज अंधारे, सुरज गाढवे,सरपंच राजुरी पै.रामा गोडगे,डॉ. प्रशांत गोपणे तालुक्यातील प्राध्यापक , लोकप्रतिनिधी सरपंच, उपसरपंच, सदस्य, मुख्याध्यापक, सहशिक्षक, विद्यार्थी ,गावातील युवा वर्ग तसेच असंख्य आष्टा ग्रामस्थ उपस्थित होते