दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: शिवराज पाटील माळेगावकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने माळेगाव ते हैदराबाद बस सेवा पूर्ववत सुरू करून या भागातील जनतेच्या सोयी साठी माळेगाव ते हैदराबाद बस सेवा पूर्ववत सुरू करून दिले.
माळेगाव ते हैदराबाद कोरोना महामारी मुळे बस सेवा खंडित झाली होती ती आज पासून आपल्या विनंतीवरून आपल्या भागाचे नेते आदरणीय व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांच्या प्रयत्नाने खंडित असलेली बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.. त्याबद्दल गोजेगावकर पाटील साहेबांचे गावकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानले तसेच डि टि ओ साहेब बिदर, राठोड साहेब डेपो मॅनेजर औराद यांचेही मनपूर्वक आभार मानले.
त्यांचा या सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.