दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय. आईनंच पोटच्या मुलांचा गळा घोटून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलांचा आईनं झोपेतच जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दोन्ही मुलांची आई मनोरुग्ण असल्याची बाब तपासात समोर आली आहे.
औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये आईनंच आपल्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. हत्येचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ झोपले होते.
सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केल्यावर डॉक्टरांनी दोघा बहिण-भावाला मृत घोषीत केलं. अदीबा फहाद बसरावी, असं मृत 8 वर्षीय मुलीचं नाव आहे. तर अली बिन फहाद बसरावी, असं 4 वर्षीय मुलाचं नाव आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आईनं दोन्ही मुलांना नेमकं का मारलं? याचा मात्र उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. पोलीस तपासात, आरोपी आई मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.