दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – अनेक दिवसांपासून लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या संदर्भात विविध संघटना पक्ष यांनी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा छञपती शिवाजी महाराज चौक लोहा येथील नियोजित जागेवर बसावा यासाठी आंदोलने मोर्चे उपोषणे केले परंतु गेड्याचं कातडं पांघरलेले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असुन अनेक दिवसांपासून छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोहा येथील छत्रपती शिवाजी चौकात बंदीस्त करून ठेवला.
अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी अनेक वर्षांपासून मागणी आहे की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवण्यात यावा पण या मागणीचा कसल्याच प्रकारचा विचार येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी घेत नाही १९ फेब्रुवारी पर्यंत हा छञपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नियोजित जागेवर बसला नाही तर अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील अन्नकाडे व कंधारचे तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील तोंडचिरे यांनी दिनांक 20 फेब्रुवारी सकाळी 12:00 वाजता छञपती शिवाजी महाराज चौक लोहा येथे आत्मदहन करण्याचा ईशारा लोहा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधर पेंन्टे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.