दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील लोक वर्गणीतून आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा नगरपालिका प्रशासनाने बंदिस्त केलेला आहे. तो पुतळा नियोजित जागी बसविण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेसमोर आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला होता सदरील उपोषणाची दखल घेऊन मुख्याधिकारी गंगाधर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. मुख्याधिकारी पेंटे यांनी उपोषणार्थींना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नियोजित जागी बसविण्या संदर्भात येणाऱ्या सर्व साधारण सभेमध्ये चार विनिमय व निर्णय होणे अपेक्षित आहे व पुढील सर्वसाधारण सभेची पुतळा समितीची अपेक्षित बैठक दिनांक 16 फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे. संभाव्य बैठकीत नियमानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. सदर लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणाची शरद पाटील पवार माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, पंकज परिहार, व्यंकट घोडके,दिगांबर डिकळे, बालाजी वाघमारे आदींची उपस्थिती होती